Weather Now : IMD ने हवामानाचा नवीन अंदाज दिला आहे. या नवीन हवामान अंदाजानुसार मराठवाडा, खानदेश, पूर्व विदर्भात पाऊस पडू शकतो. हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे. छत्तीसगडमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तेथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
बंगालच्या उपसागरात ईशान्य दिशेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.
Weather Now | आज पाऊस पडणार आहे का 2023
IMD : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही दिवसात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस मध्यम ते मुसळधार पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा भागात हा पाऊस तुरळक प्रमाणात पडेल. तसेच भंडारा आणि पूर्व गोंदिया मध्ये अनेक ठिकाणी हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा होईल.
रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक स्वरूपात पाऊस पडणार आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाडा या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
नाशिक आणि कोल्हापूरच्या काही भागात आज पाऊस हजेरी लावणार आहे.उर्वरित महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
हे पण वाचा : Panjabrao Dakh Weather Today काय म्हणतात पंजाबराव डख ? आज पाऊस पडणार आहे का 2023