Weather Update Today imd : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देशात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Moonson Withdrawl) अंदाज देण्यात आलेला आहे. देशातील अनेक भागांमध्ये परतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये परतीचा पाऊस कधीच गायब झालेला आहे. भारतीय हवामान विभागाने आज देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
परतीचा पाऊस मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. येत्या 48 तासात हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील 48 तासांमध्ये मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार तेलंगणा, उडीसा, तमिळनाडू तसेच महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यातील काही ठिकाणी पाऊस थोड्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल.
Weather Update Today India Meteorological Department
आज देशातील विविध भागांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आपल्याला पाहायला मिळाले आहे. नैऋत्य मोसमी वारे फिरत असल्यामुळे बिहार आणि मध्य प्रदेशात येत्या 48 तासात हवामान अंदाज मुसळधार पावसाचा वर्तवण्यात आलेला आहे. केरळमध्ये 10 ते 11 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
उद्याचे हवामान
Mumbai Weather Update Today : मुंबई आणि दिल्लीमध्ये आज ढगाळ वातावरण पाहायला मिळालेले आहे. उद्याचे हवामान मुंबईमध्ये हे उष्ण आणि दमट स्वरूपाचे असणार आहे. तापमान 22 डिग्री सेल्सिअस ते 36 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सोमवार ते मंगळवार ढगाळ वातावरण राहणार आहे.
सिक्किममध्ये तयार झाली पूर परिस्थिती
सिक्किममध्ये येत्या 48 तासांमध्ये पूर परिस्थिती तयार झालेली आहे. सिक्कीम मध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथे पूर आलेला आहे. त्यामुळे अनेक लोक, पर्यटक अडकले आहेत. सिक्कीम मध्ये अचानक ढग दाटून आल्यामुळे अतिवृष्टी होऊ लागली. या अतिवृष्टीमुळे संपूर्ण भागामध्ये पाणी साचून नद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला होता.अनेक पर्यटक या पुरामुळे अडकून पडलेले आहेत. यामध्ये अनेक लोक बेपत्ता आहे तर काही लोकांचा अजून तपास चालू आहे.
IMD Rain Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज, पाऊस येणार हवामान खात्याने वर्तवला हवामान अंदाज