Whether Updated : पाऊस अजुन किती दिवस आहे ?
गेल्या काही दिवसात राज्यात चाललेला पाऊस (Whether Updated 2024) पुन्हा एकदा वाढलेला आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या पावसाने आज जोर धरलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात दुपारी मोठ्या प्रमाणात ऊन पडलेले होते. या ठिकाणी तापमान जवळपास 42 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले होते. समुद्रसपाटीपासून 9 किलोमीटर उंचीवर कर्नाटकाच्या भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी वाऱ्यांसह गारांचा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला. दिवसभर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊन पडलेले होते आणि संध्याकाळी अचानक गारांचा पाऊस या भागात पडलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार या पावसाचा मुक्काम आता 20 एप्रिल पर्यंत वाढलेला आहे.
या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
नाशिक, बीड, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा, जळगाव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे.
हवामान उद्या पाऊस वेळ टेबल
महाराष्ट्रातील या भागात दिलेले आहेत येल्लो अलर्ट :
कोकणात 19 ते 20 एप्रिल पर्यंत येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. तर मध्य महाराष्ट्रात 17 ते 18 एप्रिल, मराठवाड्यामध्ये 17 ते 18 एप्रिल पर्यंत येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. विदर्भामध्ये अजूनही कोणत्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नाही.
Monsoon 2024 : आय एम डी (IMD) च्या अंदाजानुसार यंदा पाऊस 106% बरसणार.