Crop Insurance : एक रुपया मध्ये मिळणार साडेपाच लाख शेतकऱ्यांना पिक विमा

Crop Insurance : एक रुपया मध्ये मिळणार साडेपाच लाख शेतकऱ्यांना पिक विमा
Crop Insurance : एक रुपया मध्ये मिळणार साडेपाच लाख शेतकऱ्यांना पिक विमा

Crop Insurance Scheme Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा उपलब्ध करून देणार आहेत. या योजनेचे नाव पंतप्रधान पिक विमा योजना आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.

Maharashtra News : एक रुपया मध्ये साडेपाच लाख शेतकऱ्यांना पिक विमा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास 6 लाख 52 हजार शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये फायदा होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 30 जुलै पर्यंत ची मुदत दिलेली आहे. याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेचा हप्ता दोन टक्के आणि रब्बी हंगामासाठी दीड टक्के इतका आहे.तसेच खरीप आणि रब्बी पिकांसाठी जवळपास पाच टक्के इतका असेल.

Crop Insurance मध्ये समाविष्ट होणारे पिके 

बाजरी, मका, तूर, सोयाबीन, उडीद, भात, खरीप ज्वारी यासारख्या पिकांसाठी ही योजना जिल्ह्यात लागू केली आहे. 

Crop Insurance कोणा कोणाला मिळणार ?

पिक पेरणी पासून ते काढण्याच्या टप्प्यापर्यंत होणारे नुकसान भरपाई यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये वादळ, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, रोगराई  सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा समावेश असणार आहे.

हे पण वाचा : Panjab Dakh Today पंजाब डख हवामान अंदाज जुलै महिन्यामध्ये पाऊस कसा असणार

Leave a Comment