Panjab Dakh Today : पंजाब डख हवामान अंदाज जुलै महिन्यामध्ये पाऊस कसा असणार

Panjab Dakh Today : पंजाब डख हवामान अंदाज जुलै महिन्यामध्ये पाऊस कसा असणार
Panjab Dakh Today : पंजाब डख हवामान अंदाज जुलै महिन्यामध्ये पाऊस कसा असणार

Panjab Dakh Today : जुलै महिना चालू झाल्यापासून म्हणजे गेल्या दोन ते तीन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पण मराठवाड्यात अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनसाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

चार ते पाच जून रोजी यवतमाळ, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच नाशिक आणि अहमदनगर मध्ये येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 3 जुलैपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले आहे.

हे पण वाचा : Maharashtra Rain Forecast मुंबई हवामान विभागाचा अलर्ट विजांसह कोसळणार मुसळधार पाऊस

जुलै मध्ये कशाप्रकारे पाऊस पडणार | Panjab Dakh Today 

पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण जुलै महिन्यातच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस पडणार आहे व जुलै ते ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागणार आहे. पेरणीसाठी जमिनीमध्ये योग्य प्रमाणात ओलावा तयार होणार आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेला आहे.

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करू शकतात. तसेच 17 जुलै पासून 23 जुलै पर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येतो.

पंजाब डख हवामान अंदाज : महाराष्ट्राच्या विविध भागात जसे की उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसेच उर्वरित भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जुलै महिन्यात आहे.

हे पण वाचा : IMD हवामान खात्याकडून पुढील 24 तासासाठी गंभीर इशारा

 

Leave a Comment