Weather Update IMD : पुढील तीन दिवसात या जिल्ह्यांना हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. पुणे, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात येत्या काही तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
उद्याचे हवामान | पाऊस कधी पडणार आहे
उद्या राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.तीन दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. आज आणि येत्या तीन दिवसांमध्ये हवामान विभागाने बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे.
India Meteorological Department । 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र
मागील दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील पश्चिम दिशेने परतीच्या पावसाची सुरुवात झालेली आहे. गेल्या दोन दिवसात परतीच्या पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावलेली आहे. मागील एक ते दीड महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तर काही ठिकाणी पुरेसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. (Weather Update IMD)
पाऊस कधी पडणार आहे हा प्रश्न बऱ्याच जणांच्या समोर उभा राहिलेला आहे. हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे सध्या पावसाचा जोर अजून वाढणार आहे. कोकण किनारपट्टी ते विदर्भामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये वाढू शकतो. बंगालच्या उपसागरामध्ये येत्या काही तासात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होईल. या सर्व गोष्टींचा परिणाम महाराष्ट्र मध्ये पडणाऱ्या पावसावर होईल.त्यामुळे त्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
IMD | भारतीय हवामान विभाग हवामान अंदाज
अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. महाराष्ट्र मध्ये आज आणि उद्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 28 सप्टेंबर पासून ते 4 ऑक्टोबर पासून मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
Rain Update Pune : आय एम डी पुणे चे हवामान अंदाज प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की मंगळवारी संध्याकाळी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. हा पाऊस जोरदार स्वरूपाचा पडलेला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही तासात मान्सून सक्रिय राहील. पुण्यामध्ये येत्या काही दिवसात पावसाची तीव्रता कायम राहील असा अंदाज हवामाना विभागाने दिलेला आहे.(IMD Weather Update)
हे पण वाचा : Gai Gotha Anudan Yojana – (पशुपालन योजना महाराष्ट्र) गाय गोठा अनुदान योजना