Maharashtra Rain: येत्या 48 तासात हवामान अंदाज, या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या भागात पाऊस पडणार.

Maharashtra Rain: येत्या 48 तासात हवामान अंदाज
Maharashtra Rain: येत्या 48 तासात हवामान अंदाज

Maharashtra Rain Update: सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाचे पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये आगमन झालेले आहेत.

राज्याच्या उत्तरेकडील भागात अजून पाऊस झालेला नाही. अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रात पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये पडणारा पाऊस येत्या दोन दिवसात मुसळधार स्वरूपात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

आज पाऊस पडेल का महाराष्ट्र

आज नैऋत्य भागात पडलेल्या पावसाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर तसेच पंजाब, हरियाणा चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान सह पश्चिम राजस्थान मधील काही भागांमध्ये जोरदार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हिमाचल, जम्मू कश्मीर, लडाख आणि उत्तराखंडाच्या उर्वरित भागांमध्ये पाऊस येण्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 ऑक्टोबर पासून ते दहा दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून परतणार आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे त्यामुळे 1 ऑक्टोबर रोजी कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.आय एम डी च्या नवीन हवामान अंदाजानुसार अरबी समुद्रामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.(Maharashtra Rain) 

या भागांना हवामान खात्याचा रेड अलर्ट |  आज पाऊस पडणार आहे का

कोकण किनारपट्टीला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केले आहे (Maharashtra Rain Update). अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या भागांमध्ये येत्या काही तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेले आहे. या भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. महाराष्ट्र मध्ये दोन ते तीन ऑक्टोबर पर्यंत पावसाचा कोणताही अलर्ट दिलेला नाही त्यामुळे या दोन दिवसात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल.

हे पण वाचा : Panjabrao Dakh: पंजाब डख हवामान अंदाज ऑक्टोबर महिन्यात पाऊस कसा राहील, उद्याचे हवामान महाराष्ट्रात कसे असेल ?

Leave a Comment