Panjabrao Dakh: गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र मध्ये पाऊस झालेल्या नाही. पण येत्या काही दिवसात परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये जोरदार एन्ट्री केलेली आहे. सध्या पाऊस महाराष्ट्र मध्ये खूप कमी प्रमाणात पडलेला आहे. ही एक अत्यंत निराशाजनक गोष्ट आहे. जुलै महिन्यामध्ये पाऊस शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र मध्ये बरसला होता. शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पेरण्या यांनी जुलै महिन्यामध्ये झाल्या होत्या.
शेतकऱ्यांनी जुलै महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पेरण्या केल्या परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्यावाचून गेले. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे.
सप्टेंबर महिना चालू झाला तसा पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपामध्ये वाचलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
गेल्या काही महिन्यात धरणांमधील पाण्याची पातळी खाली गेलेली होती. सध्या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे ही पातळी भरून निघालेली आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अनेक लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय या अवकाळी पावसामुळे झालेली आहे. परंतु आता ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये हा अवकाळी पडणारा पाऊस कसा असणार आहे याबद्दल प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत.
पंजाब डख हवामान अंदाज
Panjabrao Dakh: प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचा अंदाज देताना सांगितले आहे की २ ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. पुढील पाच ते सात ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज : वर्धा, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि अकोला या भागांमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. याच कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते सुरळक स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळेल.
Panjabrao Dakh 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र
15 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 14 ऑक्टोबर पासून ते 24 ऑक्टोबर पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे. पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जर खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळवून त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा : Maharashtra Rain : रविवारी पडणार या भागांमध्ये जोरदार पाऊस १ ऑक्टोबर रोजी कोणत्या भागात पाऊस पडणार जाणून घ्या.