Majhi Kanya Bhagyashree Yojana online form 2023 माझी कन्या भाग्यश्री योजना (MKBY)

Majhi Kanya Bhagyashree Yojana online form 2023 | दोन मुलींसाठी योजना
Majhi Kanya Bhagyashree Yojana online form 2023 | दोन मुलींसाठी योजना

majhi kanya bhagyashree yojana registration online | दोन मुलींसाठी योजना | Majhi kanya bhagyashree yojana Registration 2023 | मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2023 | MKBY Application Form | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, फॉर्म PDF, पात्रता, योजनेचे लाभ.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

महाराष्ट्र राज्यामध्ये Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023  मध्ये मुलींचे शिक्षण, चांगले आरोग्य, भविष्यासाठी आर्थिक नियोजन  करणे, मुलींची भृणहत्या थांबवणे, लोकांच्यामध्ये मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे व मुलांप्रमाणे मुलींचा जन्मदर वाढविणे या हेतूने राज्यात शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2014 रोजी “सुकन्या” योजना सुरु करण्यात आली आहे. सुकन्या योजनेचे लाभ दिनांक 01 Jan, 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींकरिता लाभदायक ठरत आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जसे की बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरांगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यात मुलींचा जन्मदर 1000 मुलांच्या मागे 894 इतका आहे. हा सर्व आकडा लक्षात घेता आता शासनाने नवीन योजना आणली आहे .
Majhi Kanya Bhagyashree Yojana अमलात आणली. माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल सविस्तर मध्ये पाहुयात.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चा उद्देश्य (Objectives)

 • लिंग निवडीस प्रतिबंध आणणे.
 • मुलींचा जन्मदर वाढविणे.
 • मुलींच्या जीवनाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे.
 • बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात समाजात कायमस्वरूपी सामुहिक चळवळ निर्माण करणे.
 • मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.
 • सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत गट, व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे.
 • जिल्हा, तालुका, व निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे यांचा समन्वय घडवून आणणे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 Type

 • लाभार्थी टाइप 1 : एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले.
 • लाभार्थी टाइप 2 : एक मुलगी आहे आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मुख्य Highlights

 • योजनेचे नाव : माझी कन्या भाग्यश्री योजना
 • योजना राज्य : महाराष्ट्र
 • योजनेची स्थापना : 1 एप्रिल 2016
 • अधिकृत वेबसाईट : maharashtra.gov.in
 • लाभार्थी कोण : राज्याच्या मुली
 • उद्देश : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
 • व्दारा सुरुवात : महाराष्ट्र सरकार
 • विभाग नाव : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र.

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना साठी पात्रता | दोन मुलींसाठी योजना

 1. सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील (BPL) तसेच दारिद्रय रेषेच्यावरील (APL) (पांढरे रेशनकार्डधारक) कुटुंबात जन्मणाच्याअपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल.
 2. मुलीचे पाल्य महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 3. मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 4. माझी कन्या भाग्यश्री लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होणे आवश्यक राहील. तसेच तिने इयत्ता १० वी पास होणे व १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहील.
 5. पुढच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या, तर त्या दोन्ही मुली प्रकार-२ प्रमाणे योजनेस पात्र असतील.
 6. एखाद्या पाल्याने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ उपलब्द्ध राहील. परंतु लाभ प्राप्त होण्यासाठी अनाथ मुलीचे वय ० ते ६ वर्ष (६ किंवा ६ वर्षांपेक्षा कमी) इतके असावे.
 7. बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना उपलब्द्ध राहील.
 8. लाभार्थी टाइप 1 च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर व लाभार्थी टाइप 2 च्या लाभार्थी कुटुंबास दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
 9. सदर योजनेअंतर्गत १८ वर्षांनंतर LIC कडून जे रु.१,००,०००/- मिळणार आहेत त्यापैकी किमान रु.१०,०००/- मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील.
 10. ज्या लाभधारकाचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील.
 11. सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल.
 12. विहित मुदतीपूर्वी (वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी) मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नांवे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाचे नांवे असणा-या Surplus अकाऊंट किंवा खात्यात जमा म्हणून दर्शविली जाईल.
 13. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) महाराष्ट्र शासनाच्या नांवे एक नवीन पॉलिसी काढतील, ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र खाते असणार असून, Surplus खाते खालील परिस्थितीत कार्यरत करण्यात येईल.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 आवश्यक कागदपत्रे (दोन मुलींसाठी योजना)

 • पालकाचे राहिवासी प्रमाणपत्र
 • मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
 • कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
 • दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • BPL श्रेणी रेशनकार्ड
 • उत्पन्न पप्रमाणपत्र
 • मोबाइल नंबर
 • मुलीचे व मातेचे बँक पासबुक
 • पासपोर्ट साईज फोटो.

How to apply Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 (दोन मुलींसाठी योजना)

महाराष्ट्र राज्यातील ज्या पात्र पालकांना माझी कन्या भाग्यश्री या योजना 2013 लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट Official Website वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजना चा एप्लिकेशन फॉर्म PDF [Application form PDF] करावा लागेल, अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे पालकाचे आणि मुलीचे नाव, तुमचा मोबाइल नंबर, लाभार्थी बालकीचे जन्म प्रमाणपत्र आदी सर्व माहिती भरून आणि अर्जाला सर्व आवश्यक कागदपत्र जोडून, अर्ज संबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल, अशा प्रकारे आपली माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन फॉर्म

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन साठी महाराष्ट्रात ऑनलाइन अर्ज करण्याची सध्या तरी कोणतीही व्यवस्था नाही. पण तुम्ही माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन फॉर्म सहजपणे करू शकता. तो ऑफलाइन भरून अर्ज करू शकता. माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन फॉर्म करावा लागेल जो योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आढळेल. लाभ घेण्यासाठी, तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावी लागतील.

माझी कन्या भाग्यश्री योजना (MKBY) FAQ

१. माझी कन्या भाग्यश्री योजना किती लाभ मिळतो?

उत्तर : पहिल्या मुलीनंतर मातेने शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलींचे नावावर 50 हजार रुपये बँकेत मुदत ठेव म्हणून गुंतवण्यात येतात.
दोन मुली नंतर मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या बालकांच्या नावावर प्रत्येकी 25 हजार इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येते.

2. माझी कन्या भाग्यश्री योजना कधी चालू झाली ?

उत्तर : दिनांक 01 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयापर्यंत आहे असे समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना लागू केलेली आहे.

3. माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

उत्तर : सध्या तरी कोणतीही ऑनलाइन व्यवस्था नाही ,ऑनलाइन फॉर्म सहजपणे डाउनलोड करू शकता आणि ती तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावी लागतील.

4. माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये मिळणारी धनराशी मुलीला केव्हा मिळते ?

उत्तर : मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम मिळते.

हे पण वाचा : Sukanya Samriddhi Yojana In Marathi – सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी (PMSSY)

Leave a Comment