Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्र राज्यात आज पावसाचा जोर कायम राहणार आहे.असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.महाराष्ट्रातील काही भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट तर काही भागात येलो अलर्ट जारी केलेला आहे.
येत्या काही तासात महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
हवामान विभाग (IMD) दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आज चांगला पाऊस पडणार आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही.अनेक भागात हा पाऊस अत्यंत मुसळधार स्वरूपात पडलेला आहे. यातच हवामान विभागाने नवीन हवामान अंदाज दिलेला आहे. महाराष्ट्र राज्यात ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.
आज पाऊस पडेल का महाराष्ट्र | Maharashtra Weather Forecast
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात विदर्भ, मराठवाडा,कोकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तसेच कोल्हापूरमध्ये देखील ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
मुंबई, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आय एम डी ने दिलेले आहे.
हे पण वाचा : पंजाब डख हवामान अंदाज : Panjabrao Dakh यांच्या हवामान अंदाजानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये या भागांमध्ये होणार अतिवृष्टी.
उद्याचे हवामान | IMD Weather Forecast
राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यात भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसलेला होता. परंतु आज भंडारा जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. सकाळपासून राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण असताना दुपारच्या सुमारास राज्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून राज्याच्या विविध भागांमध्ये उकाडा निर्माण झालेला होता. पण दुपारनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा तयार झालेला आहे. या जोरदार झालेल्या पावसामध्ये अनेक पिकांना भरपूर पाणी मिळालेले आहे. (Maharashtra Weather Forecast)
उद्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपात पडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
आज पाऊस पडणार आहे का
आज राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस (Maharashtra Weather Forecast) पडणार आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि हवामान विभागाने जारी केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे पूर परिस्थिती तयार होऊ शकते. यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वारा वाहत आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टीवर आणि पावसाच्या भागात जाणे नागरिकांनी टाळावे असे आव्हान हवामान विभागाने दिलेले आहे.
हे पण वाचा : IMD Weather Update : बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी…काय म्हणते भारतीय हवामान विभाग ?