Mumbai Rains : मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी पुढचे ४८ तास खूप महत्त्वाचे

mumbai weather forecast
mumbai weather forecast

Mumbai Rains Updates : अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत पावसाने चांगलचे झोडपून काढले आहे. मुंबईमध्ये कालपासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी साचलेले आहे. अंधेरी, किंग सर्कल या खोलगट भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. 

शनिवारी मुंबईमध्ये 115 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद हवामान खात्यानुसार झाली. सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे याचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात  परिणाम  झाला आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रातील पुण्यामध्ये कधी पडणार पाऊस मान्सून लांबण्याचे कारण सांगितले वेधशाळेने

मुंबईमधील नागरिकांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा 

पुढील ४८ तास मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.  हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच मुंबईच्या जुहू बीचवर दोन जण पोहायला जात असताना पोलिसांनी या दोघांचा जीव वाचवला. समुद्रकिनारी फिरायला जाताना नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली पाहिजे. जास्त पाणी असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. (mumbai weather forecast)

मुंबईतील पाऊस पुढील ४-५ दिवस मुसळधार पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबातील सर्वाची काळजी घ्यावी. 

धन्यवाद.    

Weather Forecast : पंजाबराव डख यांनी वर्तवला नवीन हवामान अंदाज या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये होणार तीव्र मान्सूनचे आगमन.

 

 

Leave a Comment